डॉकयार्ड दुर्घटना : सात अधिकाऱ्यांचं निलंबन

इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील सात अधिका-यांना निलंबीत करण्यात आलंय. बाजार विभाग आणि नियोजन संकल्प चित्रे विभागातील सात अधिका-यांचा यात समावेश आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 29, 2013, 11:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई महानगरपालिकेतील सात अधिका-यांना निलंबीत करण्यात आलंय. बाजार विभाग आणि नियोजन संकल्प चित्रे विभागातील सात अधिका-यांचा यात समावेश आहे.
याशिवाय महापालिकेतील इतर १८ जणांची चौकशी होणार आहे. कार्यकारी अभियंता एम. एन. पटेल, वरीष्ठ अभियंता एम. के. देडेकर, एस.एन. येले, एन.एन. घाडगे, राहुल जाधव, उपअधिक्षक डॉ. बी. सी. चव्हाण, निरीक्षक जमाल काझी अशी कारवाई झालेल्या सात अधिका-यांची नावं आहेत. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चौरे यांचीही चौकशी होणार आहे.
तसंच दुर्घटनेनंतर महापालिकेला आली जाग आली आहे. इमारत सुरक्षा आयोगाची होणार स्थापना करण्यात येणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती या आयोगाचे अध्यक्ष असतील. IIT आणि VJIT चे तज्ज्ञ सदस्य म्हणून काम करतील तर सदस्यांमध्ये स्ट्रक्चरल कंसल्टंटचाही समावेश असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.