विमान प्रवासाआधीचा ताण कमी करणार कुत्रे

मुंबई : विमानानं प्रवास करायच्या आधी अनेक जणांच्या चिंता वाढतात.

Updated: Feb 20, 2016, 10:59 AM IST
विमान प्रवासाआधीचा ताण कमी करणार कुत्रे title=

मुंबई : विमानानं प्रवास करायच्या आधी अनेक जणांच्या चिंता वाढतात. पण अशाच प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाने आता 'डॉग थेरपी' सुरू केली आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ टर्मिनलवर हा प्रयोग सध्या करण्यात येत आहे. तो यशस्वी झाल्यास मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे.

कुत्रा हा माणसाचा मित्र मानला जातो. आपल्या आवडत्या कुत्र्याशी थोडा वेळही खेळल्याने लोकांच्या मनावरचा ताण दूर होतो आणि मन प्रसन्न होते असे मानले जाते. म्हणूनच पुण्यातील अॅनिमल एंजल्स थेरपी सेंटरच्या माध्यमातून हा प्रयोग मुंबई विमानतळावर राबवण्यात येत आहे. 

सध्या गोल्डन रिट्रीव्हर जातीचे चार कुत्रे सायंकाळी ७ ते रात्री एक या वेळात प्रवाशांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संस्थेतर्फे त्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. हे कुत्रे माणसाची मानसिक स्थिती समजून घेऊ शकतात आणि त्याप्रमाणे माणसाच्या मनावरील ताण दूर करण्याचा प्रयत्न करतात.