मुंबईकरांनो गाडीला लटकून प्रवास करू नका

गोवंडीला राहणारा हा आहे नवनाथ यमगर... तीन वर्षांपूर्वी आयटीआय परीक्षेचं हॉल तिकीट आणणअयासाठी तो दादर बोरिवली प्रवास करत होता. 

Updated: Dec 1, 2015, 09:24 AM IST

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : डोंबिवलीतला युवक भावेश नकातेचा रेल्वेगाडीतून पडून झालेला नुकताच मृत्यू चटका लावून गेला. पण यातून कोणीच काहीच धडा शिकलेलं नाही. सकाळच्या गर्दीच्या वेळीच नाही तर दिवसभरात कोणत्याही वेळी गाडीला लटकून प्रवास करणारे अजूनही आहेतच. असे अपघात अनुभवलेले मुंबईकर काय सांगतायत ऐका...

गोवंडीला राहणारा हा आहे नवनाथ यमगर... तीन वर्षांपूर्वी आयटीआय परीक्षेचं हॉल तिकीट आणणअयासाठी तो दादर बोरिवली प्रवास करत होता. त्यावेळी गर्दीच्या रेट्यामुळे तो गाडीतून बाहेर फेकला गेला. अपघातात त्याचा उजवा हात आणि पाय कापला गेला. नवनाथचं त्यावेळी वय होतं फक्त 22... नितीन मुंबईकरांना काय आवाहन करतोय ऐका...

खासदार किरीट सोमय्या यांच्या मदतीमुळे नवनाथला कृत्रिम अवयव मिळाले. त्याच्या आयुष्याची नव्याने सुरूवात झाली. पण अशी घटना अन्य कोणासोबत न घ़डो ही प्रार्थना त्याचे कुटुंबीय करतात. 

मुंबईची गर्दी दिवसेंदिवस वाढतेय. एवढ्या जणांना सामवून घेण्यात रेल्वे यंत्रणा कमीच पडतेय. या गर्दीचं योग्य नियोजन करण्याची गरज आहे. पण त्याचबरोबर मुंबईकरांनीही स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे. घाई आणि बेफिकीरी आपलं आयुष्य उध्वस्त करू शकते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.