सावधान, ३१ डिसेंबरच्या रात्री लाईट बंद करायच्या नाहीत!

ख्रिसमसनंतर आता प्लॅनिंग सुरू झालंय, थर्टीफर्स्ट नाईट सेलिब्रेशनचं... पण हेच प्लॅनिंग करत असताना तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे... ‘थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन प्रकाशातच करायचं, लाईटस बंद करुन सेलिब्रेशन करायचं नाही’ अशी महत्त्वाची सूचना मुंबई पोलिसांनी दिलीय.  

Updated: Dec 26, 2014, 09:39 AM IST
सावधान, ३१ डिसेंबरच्या रात्री लाईट बंद करायच्या नाहीत! title=

मुंबई : ख्रिसमसनंतर आता प्लॅनिंग सुरू झालंय, थर्टीफर्स्ट नाईट सेलिब्रेशनचं... पण हेच प्लॅनिंग करत असताना तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे... ‘थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन प्रकाशातच करायचं, लाईटस बंद करुन सेलिब्रेशन करायचं नाही’ अशी महत्त्वाची सूचना मुंबई पोलिसांनी दिलीय.  

थर्टी फर्स्टला डिस्को थेकवर जाऊन धांगडधिंगा घालण्याचा आणि बेधुंद होऊन डान्स करण्याचा प्लॅन असेल.... तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे...

रात्री बारा वाजता लाईटस ऑफ करायचे... आणि त्याच डिम लाईटसमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर मनसोक्त नाचण्याचा प्लॅन असेल... तर आता ते शक्य नाही... कारण नववर्षाचं स्वागत उजेडातच करायचं. लाईटस ऑफ करुन करायचं नाही, अशा सूचना पोलिसांनी केल्यात. पब, डिस्कोज आणि पार्ट्यांमध्ये पुरेसा लाईट असणं गरजेचं आहे. जिथे पार्टी होतेय. त्या जागेवर अंधार नव्हे तर उजेड असला पाहिजे, अशा नोटिसा पोलिसांनी डिस्को, पब्ज आणि पार्टी आयोजकांना बजावण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भारगुडे यांनी म्हटलंय.  

३१ डिसेंबरच्या रात्री तुम्ही पार्टी किंवा फिरायला जात असाल तर आपल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्येच रहा... आपल्या ग्रुपमधील मित्र किंवा मैत्रिणीला एकटं सोडून नका... शिवाय, नविन वर्षाचं सुरक्षितरित्या स्वागत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही करण्यात येतं.

सो फ्रेंड्स... ‘थर्टी फर्स्ट नाईट’ नक्की एन्जॉय करा. पण त्याआधी पोलिसांच्या सूचना जाणून घ्या... आणि थर्टी फर्स्टच्या रात्री ‘डोन्ट टर्न ऑफ द लाईटस’ हे नक्की लक्षात ठेवा...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.