एफडीएच्या कारवाईत लाखो रूपयांचे बनावट लोशन जप्त

यंदाचा उन्हाळा जास्तच हॉट असणाराय.. मार्च महिन्यातच मुंबईचा पारा चढलाय. या धूपमध्ये कसं घराबाहेर पडायचं, असा प्रश्न तमाम रूप की राण्यांना पडलाय...

Updated: Mar 27, 2017, 07:01 PM IST
एफडीएच्या कारवाईत लाखो रूपयांचे बनावट लोशन जप्त title=

मुंबई : यंदाचा उन्हाळा जास्तच हॉट असणाराय.. मार्च महिन्यातच मुंबईचा पारा चढलाय. या धूपमध्ये कसं घराबाहेर पडायचं, असा प्रश्न तमाम रूप की राण्यांना पडलाय...

अशात आपलं सौंदर्य जपण्यासाठी सनस्क्रीन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी.. घाटकोपरला एका कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनानं छापा घालून अनधिकृतपणं तयार केलेली सनस्क्रीन लोशन्स जप्त केलीत. बाजारात तब्बल २ हजार रुपयांपासून विकली जाणारी ही लोशन्स विविध ब्रँडच्या नावानं खपवली जातात. अशा बनावट लोशन्समुळं चेहरा खराब होवून त्यावर रॅशेस आणि अॅलर्जी होऊ शकते.
 
तळपत्या उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी तरूणी आणि महिला महागड्या, ब्रँडेड क्रिम्सना पसंती देतात. पण प्रत्यक्षात त्यांना फसवलं जातंय, हे त्यांच्या लक्षात येत नाही.

तेव्हा मैत्रिणींनो, यंदाच्या उन्हाळ्यात स्वतःची काळजी तर घ्याच... पण ग्राहक म्हणून तुमची फसवणूक होणार नाही, याचीही खबरदारी घ्या... हॅप्पी समर...