राणीच्या बागेत आले नवे पाहुणे...

ब-याच प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईतल्या राणीच्याबागेत आठ पेंग्विन दाखल झालेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे प्राणीसंग्रहालयात पेंग्विन आणण्यात आलेत. यामध्ये तीन नर आणि पाच मादी पेंग्विन आहेत. 

Updated: Jul 26, 2016, 07:45 PM IST
राणीच्या बागेत आले नवे पाहुणे... title=

मुंबई : ब-याच प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईतल्या राणीच्याबागेत आठ पेंग्विन दाखल झालेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे प्राणीसंग्रहालयात पेंग्विन आणण्यात आलेत. यामध्ये तीन नर आणि पाच मादी पेंग्विन आहेत. 

आज पहाटे चार वाजता दक्षिण कोरियातील सेऊल येथून आठ तासांच्या प्रवासानंतर हे पेंग्विन मुंबईत दाखल झालेत... सध्या त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून अडीच तीन महिन्यानंतर हे पेंग्विन लोकांना पाहता येणारेत... 

हे आठही पेंग्विन १ ते ३ वर्षे वयाचे आहेत. पेंग्विनचं सरासरी आयुर्मान २५ वर्षे इतकं असतं.. मासे हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे.. या पाहुण्यांना १६ ते १८ डिग्री तापमानात ठेवण्यासाठी १७०० चौरस फूट इतक्या जागेची विशिष्ट रचना करण्यात आलीय...

पाहा त्या पेग्विंनचा व्हिडिओ...