आठ वर्षीय मुलीवर बलात्कार

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, October 26, 2012 - 15:39

www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या चेंबुर भागात एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. मुलीच्या कुटुबियांनी केशव खांदरे याच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली असून पोलिसांनी खांदरे याला अटक केली.
पीडित मुलगी १७ ऑक्टोबरला संध्याकाळी दांडिया खेळण्यासाठी घरातून निघाली होती. जन कल्याण बँकेजवळ ती येताच केशवनं दिला फसवून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला असं पीडित मुलीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.
पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीनंतर या प्रकरणातील आणखी काही महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

First Published: Friday, October 26, 2012 - 15:39
comments powered by Disqus