'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'

मुंबईतल्या अवैध पर्ससीन बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना पाच कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल ३० कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समीतीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय. 

Updated: Jun 3, 2016, 11:15 PM IST
'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'  title=

मुंबई : मुंबईतल्या अवैध पर्ससीन बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना पाच कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल ३० कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समीतीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय. 

१२ नॉटिकलच्या माईल्सच्या आत पर्ससीन बोटींना मासेमारी करण्यास केंद्र आणि राज्यानं परवानगी नाकारली होती. मात्र, खडसेंनी पर्ससीन बोट मालकांच्या हितासाठी हा निर्णय फिरवल्याचा आरोप तांडेल यांनी केलाय. 

खडसेंचा हा पहिला घोटाळा असून त्यांचे आणखी घोटाळे आम्ही टप्प्या टप्प्यानं बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

दरम्यान, तांडेल यांचे आरोप निराधार असून स्वत: तांडेलच भ्रष्टाचारी असल्याचा पलटवार खडसेंनी केलाय.