आयडीबीआय बँक भरणार २,२०० जागा, Employment opportunities in IDBI bank

आयडीबीआय बँक भरणार २,२०० जागा

आयडीबीआय बँक भरणार २,२०० जागा
www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई

बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बॅंकेत नव्याने ३० टक्के नोकर भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, आयडीबीआय बँकेत २,२०० जागा भरण्यात येणार आहे.

देशातील दुसरी मोठी बँक आयडीबीआयने देशभरात ३०० नव्या शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्हाला २,००० ते २,२०० नवीन कर्मचारी भरावे लागणार आहेत, असे या बॅंकेने म्हटले आहे. त्यामुळे बॅंकेमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे.

त्यातच आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरण्यात येणार आहेत. आयसीआयसीआय बँकेने यंदा ५ हजार ते ६ हजार कर्मचाऱ्यांची नवी भरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. तर विस्तार योजना आणि सेवानवृत्ती यामुळे यंदा आयसीआयसीआयला ५ ते ६ हजार नवे कर्मचारी घ्यावे लागणार आहेत.

बॅंकिंग क्षेत्रात अनेक बॅंकांनी आपल्या शाखांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शाखांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य बळाची गरज भासणार आहे. त्यामुळे नव्याने नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या वर्षी सुमारे ८० हजार नव्या नोकऱ्या या क्षेत्रात निर्माण होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २५ ते ३० टक्क्यांनी अधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी मोठय़ा प्रमाणावर विस्तार योजना हाती घेतल्या आहेत. त्याचा परिणाम असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 03, 2013, 16:20


comments powered by Disqus