शेतकरी मारहाण : पोलिसांनी केली विरोधकांची दिशाभूल

 मंत्रालयमध्ये धक्काबुक्की झालेल्या रामेश्वर भुसारे शेतक-याची आज विरोधी पक्षांनी मरीन ड्राइव पोलिस स्टेशनमध्ये भेट घेतली. यामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, अजित पवार, शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. शेतक-याची भेट घेण्यासाठी पोहचलेल्या विरोधकांची पोलिसांनी चांगलीच दिशाभूल केली. 

Updated: Mar 24, 2017, 05:47 PM IST
 शेतकरी मारहाण : पोलिसांनी केली विरोधकांची दिशाभूल  title=

मुंबई :  मंत्रालयमध्ये धक्काबुक्की झालेल्या रामेश्वर भुसारे शेतक-याची आज विरोधी पक्षांनी मरीन ड्राइव पोलिस स्टेशनमध्ये भेट घेतली. यामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, अजित पवार, शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. शेतक-याची भेट घेण्यासाठी पोहचलेल्या विरोधकांची पोलिसांनी चांगलीच दिशाभूल केली. 

 
 सुरुवातीला  मात्र संबंधित शेतकरी कोर्टात गेला असल्याचे सांगितले. मात्र विरोधकांनी पोलिस स्टेशनमध्ये भुसारे यांना शोधले. पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल विरोधीपक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली. 
 

 का झाली होती शेतकऱ्याला मारहाण...

 
 शेतकरीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन यावेळी विरोधकांनी दिले. अजित पवार यांनी शेतकरी भुसारे प्रकरणवरून सत्ताधा-याचा चांगलाच समाचार घेतला.

 
 गारपिटीची नुकसान भरपाई मागणाऱ्या शेतकऱ्याला मंत्रालयात मारहाण झाल्याचं समोर येतं आहे. गारपिटीनं नुकसान झालेले रामेश्वर भुसारे नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात आले होते. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असं सांगत भुसारे यांनी तिथेच ठिय्या मांडला.

पण ते जात नाहीत असं पाहून तिथल्या सुरक्षा रक्षकानं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप भुसारेंनी केला आहे.