ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई

ग्राहकांना कधी लाकडं तर कधी दगड पाठवणाऱ्या स्नॅपडीलवर आज आणखी एक पराक्रम केल्याचं उघड झालंय. 'स्नॅपडील'कडून  डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री होत असल्याचं स्पष्ट करतअन्न आणि औषध प्रशासन विभागानं या ऑनलाईन वेबसाईटवर कारवाई केलीय. 

Updated: Apr 17, 2015, 05:30 PM IST
ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई title=

मुंबई : ग्राहकांना कधी लाकडं तर कधी दगड पाठवणाऱ्या स्नॅपडीलवर आज आणखी एक पराक्रम केल्याचं उघड झालंय. 'स्नॅपडील'कडून  डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री होत असल्याचं स्पष्ट करतअन्न आणि औषध प्रशासन विभागानं या ऑनलाईन वेबसाईटवर कारवाई केलीय. 

ऑनलाईन औषधे विक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाईचा बडगा उगारला आहे. विलेपार्ले येथील  स्नॅपडीलच्या गोडावूनवर एफडीएनं धाड़ टाकत मोठ्या प्रमाणात औषधं जप्त केली आहेत. तसंच संबंधित कंपनीला नोटीसही पाठवण्यात आलीय. 

राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आलीय. औषधे विक्रीसाठी एफडीएकडून परवानगी घेण्याची आवश्यकता असते. तसंच डॉक्टरांचे प्रिस्किप्शन असल्याशिवाय औषधे विकता येत नाहीत. त्यामुळं लोकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन ही कारवाई केल्याची माहिती एफडीएनं दिलीय. 

स्नॅपडीलप्रमाणेच ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या अन्य कंपन्यांवरही कारवाई करणार असल्याचा इशारा 'एफडीए'नं दिलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.