गोरेगाव फिल्म सिटीमध्ये राजेश शिंदे यांच्यावर गोळीबार

गोरेगाव येथील आरे फिल्म सिटीमध्ये गोळीबार करण्यात आला. यामुळे फिल्मसिटीमध्ये तणावाचे वातावरण आहे. राजू शिंदे यांच्यावर दोन गोळा झाडण्यात आल्यात.

Updated: May 22, 2015, 04:15 PM IST
गोरेगाव फिल्म सिटीमध्ये राजेश शिंदे यांच्यावर गोळीबार title=

मुंबई : गोरेगाव येथील आरे फिल्म सिटीमध्ये गोळीबार करण्यात आला. यामुळे फिल्मसिटीमध्ये तणावाचे वातावरण आहे. राजू शिंदे यांच्यावर दोन गोळा झाडण्यात आल्यात.

फिल्मसिटीत काही अज्ञातांनी एका कंत्राटदारावर गोळीबार केल्याची घटना पुढे आली आहे. गोळीबार करण्यात आलेली व्यक्ती एका सिक्युरिटी एजन्सीचा मालक असल्याचे समजते. फिल्मसिटीच्या गेट नंबर दोनवर ही घटना घडली. दुचारीवरून आलेले हल्लेखोर थेट फिल्मसीटीमध्ये घुसून राजू शिंदे या कंत्राटदारांवर गोळ्या झाडून पसार झाले. 

मात्र, स्थानिक नागरिक आणि सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात यश आले. तर, एक जण फरार झाला आहे. दरम्यान, गोळीबार करण्यात आलेल्या राजू शिंदे यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.