मुंबई लोकलमध्ये फायरिंग, एक अत्यवस्थ

मुंबईत लोकलमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय.. तरबेज जेठवा असं या व्यक्तीचं नाव आहे.. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सीएसटीहून अंबरनाथकडे जाणा-या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 7, 2013, 11:28 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत लोकलमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय.. तरबेज जेठवा असं या व्यक्तीचं नाव आहे.. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सीएसटीहून अंबरनाथकडे जाणा-या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय...
तरबेज जेठवा या लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते.. त्यावेळी सीटच्या क्षुल्लक कारणावरुन त्यांचं चार जणांच्या ग्रुपशी भांडण झालं.. यातून झालेल्या बाचाबाचीतून नाहूर स्टेशनवर ट्रेन येताच तरबेज जेठवावर रिव्हॉल्वरमधून २ राऊंड फायर करण्यात आले.. यांत तरबेज जेठवा गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.. घटनेनंतर चौघंजण फरार झालेत...
या घटनेमुळं मुंबईत रेल्वेच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचं समोर आलंय.. लोकलमध्ये एखाद्या प्रवाशाकडे रिव्हॉल्वर कशी असा प्रश्न निर्माण झालाय.. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्याचा दावा गृहखातं आणि पोलीस करतात.. मात्र लोकलमध्ये प्रवाशाकडे रिव्हॉल्वर कशी आली हा प्रश्न अनुत्तरितच आहे..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.