अन्न नागरी पुरवठा विभागात भरती

Last Updated: Tuesday, March 26, 2013 - 14:39

www.24taas.com, मुंबई
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय विस्तार मुंबई याकरिता शिपाई या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती सरळ सेवेने करण्यात येणार आहे. गट- ड श्रेणी (वर्ग – ४) यासाठी दोन पदे रिक्त आहेत.
शिपाई पदासाठी किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण आवश्यक. अर्जदाराचे कमाल वय ३३ आवश्यक आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी कमाल वय ३८ वर्षापर्यंत शिथील करण्यात आले आहे. या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. (वेतनश्रेणी रू. ४४००-७४४० + ग्रेड वेतन रू. १३०० अधिक शासन नियमानुसार मिळणारे इतर भत्ते)

या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून निर्धारित नमुन्यात दि २८.०३.२०१३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. २८.०३.२०१३ या कालावधीतीलच अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा. http://maharojgar.gov.in
अन्न नागरी पुरवठ व ग्राहक संरक्षण विभाग, २रा मजला, मंत्रालय विस्तार, मुंबई – ३२ दूरध्वनी क्रमांक – २२७९३०५० या पत्त्यावर संपर्क साधता येईल.

First Published: Tuesday, March 26, 2013 - 14:39
comments powered by Disqus