सहा वर्षांच्या मुलीनं दिला शहीद इवलेकरांना अग्नी

शुक्रवारी अंधेरीतल्या ‘लोटस’ इमारतीत लागलेली आग विझवताना शहीद झालेले अग्निशमन दलाचे जवान नितिन इवलेकर यांच्यावर आज विरारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

Updated: Jul 20, 2014, 09:08 AM IST
सहा वर्षांच्या मुलीनं दिला शहीद इवलेकरांना अग्नी title=

मुंबई : शुक्रवारी अंधेरीतल्या ‘लोटस’ इमारतीत लागलेली आग विझवताना शहीद झालेले अग्निशमन दलाचे जवान नितिन इवलेकर यांच्यावर आज विरारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

इवलेकरांच्या सहा वर्षांच्या मुलीने – सोन्वी हिने त्यांना मुखाग्नी दिला... यावेळी, सगळ्यांचंच मन हेलावून गेलं. इवलेकरांना अखेरचा निरोप देताना त्यांचे सहकारी, नातेवाईक यांना अश्रू आवरले नाहीत. 

विरार इथल्या विराट नगरमधल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वसई-विरार महानगर पालिकेच्या अग्नीशमन दलानंही नितीन यांना मानवंदना दिली. 

इवलेकर यांच्या पत्नीने केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. शहीद नितीन इवलेकराच्या पत्नीला एका महिन्याच्या आत मदत तसेच महापालिकेत नोकरीची लेखी हमी देण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.