महिला अत्याचारांच वाढ, देशात चिंता

By Surendra Gangan | Last Updated: Monday, April 22, 2013 - 09:22

www.24taas.com, मुंबई

`निर्भया`वरील अत्याचारामुळे शरमेने खाली गेलेली देशाची मान वर येण्याच्या आत राजधानीतच चिमुकल्या `अबोली`वरील अत्याचारामुळे नव्याने रान पेटलेय. निषेधाची धग वाढू लागली असतानाच शनिवार आणि रविवारच्या दोन दिवसांत देशात बलात्काराच्या आणखी काही घटना उजेडात आल्या. महाराष्ट्रात घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

डोंबिवलीतील तरूणीचे अपहरण करून नवी मुंबईत बलात्कार केला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी डोंबिवलीतील तरुणीला खारघर परिसरात नेऊन आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. रविवारी या पीडित तरुणीने तिथून सुटका करून घेतली.
नवी मुंबईजवळ खारखरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतलंय. बदलापूरहून या पीडित तरुणीचं अपरहरण करण्यात आलं होतं.
नांदेडमधील एका अल्पवयीन मुलीला शिर्डीला पळवून आणून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बाबा ऊर्फ अहमद याला पोलिसांनी शिर्डीतून अटक केली.
मध्यप्रदेशातल्या सिवानीमधल्या बलात्कार पीडित मुलीला उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आलंय. सिवानीमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झालाय. एका नराधमाच्या दुष्कृत्याला बळी पडलेल्या मध्य प्रदेशातील चार वर्षांच्या चिमुरडीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. तिला कृत्रिम श्वा सोच्छ्वासावर ठेवले आहे. शिवनी जिल्ह्यातील या चिमुकलीवर दोघांनी पाशवी अत्याचार केला होता.
तर पिंपरी चिंचवड मध्येही एका बावीस वर्षीय गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. चिंचवड मधल्या सुयश रुग्णालयात हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे या दवाखान्यात काम करणारया कंपाउंडरनेच हा बलात्कार केलाय. सुभाष मुधळकर अस त्या नराधमाच नाव आहे. झालेला प्रकार दडपून टाकण्यासाठी रुग्णालयाचे चालक डॉक्टर विशाल सोनावणे आणि वर्षा सोनावणे यांनी आरोपीच्या नातेवाईकांकडून खंडणी मागितल्याच समोर आलंय. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलय.

मध्य प्रदेशमधील खरगोण जिल्ह्याच्या चेनपुरा पोलीस स्टेशन परिसरातील मारूगढ गावातील काल सायंकाळी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय बालिकेचे शव आज नदीत आढळून आले. या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
उत्तर प्रदेशात अलीगडच्या बन्नादेवी पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी बलात्कारानंतर एका सहा वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी आज पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बलात्काराच्या संतापजनक प्रकारानंतर राजधानीत निदर्शने सुरूच असून, आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवास्थानाबाहेर तर भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. एम्स रुग्णालयाबाहेरही दिल्लीकरांनी जोरदार निदर्शने केली.

First Published: Monday, April 22, 2013 - 09:22
comments powered by Disqus