कचरा वेचणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार!

मुंबईमध्ये एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आलीय. ही महिला कचरा वेचण्याचं काम करते.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 21, 2013, 08:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईमध्ये एका ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आलीय. ही महिला कचरा वेचण्याचं काम करते.
संबंधित महिला मुलुंडमध्ये राहुलनगर भागात उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये झोपली असताना हा प्रकार घडला. इथं आलेल्या तीन जणांनी या महिलेला पाहिलं. त्यांनी तिला उचलून जवळच्याच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीने घेऊन गेले आणि तिथंच या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.

दरम्यान, या प्रकरणात तीन जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.