मुंबईत गॅस पाईपलाईनला भीषण आग, तीन कामगार जखमी

कांजूरमार्ग येथील गांधीनगरजवळ रात्री अडीचच्या सुमारास गॅस पाईपलाईनला भीषण आग लागली. या आगीत 3 कामगार गंभीर जखमी झालेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 21, 2017, 08:20 AM IST
मुंबईत गॅस पाईपलाईनला भीषण आग, तीन कामगार जखमी

मुंबई : कांजूरमार्ग येथील गांधीनगरजवळ रात्री अडीचच्या सुमारास गॅस पाईपलाईनला भीषण आग लागली. या आगीत 3 कामगार गंभीर जखमी झालेत. 

लालबहादूर शास्त्री मार्गावर गांधीनगर सर्कल येथे जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याचे खोदकाम सुरु होते. या दरम्यान रस्त्याखालून जाणारी गॅसलची पाईपलाईन फुटून गॅसची गळती सुरु झाली आणि आग लागली.

क्षणार्धात या आगीनं रौद्ररुप धारण केले. आग लागताच अग्निशमन दालाल पाचारण करण्यात आलं. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यास यश आले. या दुर्घटनेत रामसिंग राठोड, गजानन जाधव, गजान पवार हे कामगार भाजले असून या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.