सिलिंडरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अशी होते चोरी...

स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर १५ दिवसांपूर्वी लावला होता. लगेचच संपला, त्याआधीचा सिलिंडर २२ दिवस चालला. यावेळी असं कसं झालं, अशी सहज प्रतिक्रिया गृहिंणीमध्ये ऐकायला मिळते. मात्र, तुम्हाला मिळणारा सिलिंडर कमी वजनाचा असतो. म्हणजेच चोरी झालेली असते.

Updated: Oct 16, 2015, 09:32 AM IST
सिलिंडरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अशी होते चोरी... title=

मुंबई : स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर १५ दिवसांपूर्वी लावला होता. लगेचच संपला, त्याआधीचा सिलिंडर २२ दिवस चालला. यावेळी असं कसं झालं, अशी सहज प्रतिक्रिया गृहिंणीमध्ये ऐकायला मिळते. मात्र, तुम्हाला मिळणारा सिलिंडर कमी वजनाचा असतो. म्हणजेच चोरी झालेली असते.

अधिक वाचा : गॅस सिलिंडर सोबत वजन काटा बंधनकारक!

दिवसाढवळ्या तेही रस्त्यावर छोट्या हत्ती टेम्पोमध्येच  सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिकाम्या सिलिंडरमध्ये भरलेल्या सिलिंडरमधून गॅसची चोरी करण्यात येत आहे. त्यानंतर वजन किती आहे, याची चाचणीही घेतली जाते. प्रत्येक सिलिंडरमधील गॅस थोडा थोडा चोरायचा आणि ग्राहकांना गंडा घालण्याचा धंदा सुरु करायचा, हेच या व्हिडिओवरुन दिसत आहे.

दरम्यान, तुम्ही जो गॅस सिलिंडर घेत आहात, त्याचे वजन करुन घेणे आवश्यक आहे. तसा तो ग्राहकाचा अधिकार आहे. गॅस देणाऱ्याकडे वजन काटा आवश्यक करण्यात आलाय. त्यामुळे तुम्ही वजन केल्याशिवाय सिलिंडर घेऊ नका.

पाहा हा धक्कादायक व्हिडिओ :

 

अशी होते गॅसची चोरी।

Posted by Gass on Tuesday, 21 July 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.