गीता गवळी सेनाभवनात, उद्धव ठाकरेंची घेणार भेट

  अपक्ष नगरसेविका गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या मातोश्रीवर पोहोचल्या आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 2, 2017, 05:06 PM IST
गीता गवळी सेनाभवनात, उद्धव ठाकरेंची घेणार भेट title=

मुंबई : महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये राजकीय चुरस पाहायला मिळाली. आता मुंबईत महापौर कोणाचा बसणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक कोण खेचतो यावरच सर्व गणित निर्णायक ठरणार आहे. शिवसेनेकडे 88चे संख्याबळ आहे. आता या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. अपक्ष नगरसेविका गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्या सेनाभवनात पोहोचल्या आहेत.

अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी सेनाभवनात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पाठींब्याबाबत घेणार निर्णय घेणार आहे. भाजपकडून आमदार आशिष शेलार आणि प्रसाद लाड यांच्याकडून संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी आपला निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र, आणखी एक अपक्ष नगरसेवक पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला तर सेनेकडे 90 चे बळ होऊ शकते.

 महापौर पदाची निवडणूक 8 मार्चला होत आहे. भाजपकडे संख्याबळ 82 आहे. त्यामुळे या अटीतटीच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक कोणाला पाठिंबा देतात, यावरच सर्व राजकीय गणित अवलंबून आहे. सध्यातरी शिवसेनेकडे संख्याबळ जास्त दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसणार, अशी चर्चा आहे. तसा शिवसेनेने दावा केला आहे. तर भाजपने आमचाच महापौर असेल, असे म्हटले आहे. त्यामुळे एक एक मत महत्वाची भूमिका बजावणार आहे.