मुंबईत जर्मन मुलीवर बलात्कार

By Jaywant Patil | Last Updated: Monday, November 5, 2012 - 17:53

www.24taas.com, मुंबई
मुंबईत जर्मन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीये. चोरीच्या उद्देशानं घुसलेल्या चोरट्यांनी बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आलीये.
आज पहाटे साडेतीन वाजता चोर मुलगी राहत असलेल्या तिस-या मजल्यावरील घरात शिरला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यानं या मुलीवर बलात्कार केला. शिवाय घरातील काही युरो आणि कॅमेराही चोरला. या मुलीनं स्वतःला वाचवण्यासाठी एका खोलीत स्वतःला कोंडून घेत आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांनी दिली. त्यावेळी चोर खिडकीतून पसार झाला.
या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली जात असून अहवाल आल्यानंतर त्यावर कारवाई केली जाणार आहे. ही मुलगी म्युझिशियन असून ती जून महिन्यापासून या घरात राहते.. घटनेवेळी तिची रुम पार्टनर केरळला गेली होती..

First Published: Monday, November 5, 2012 - 17:52
comments powered by Disqus