गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय

मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय. ३२ इंच व्यासाची ही पाईपलाईन आहे. पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. या पाईपलाईनफुटीमुळे आजा गिरगांव, ठाकूरद्वार इथला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय. ३२ इंच व्यासाची ही पाईपलाईन आहे. पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. या पाईपलाईनफुटीमुळे आज गिरगांव, ठाकूरद्वार इथला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
गिरगाव चौपाटीजवळ ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटल्याने रस्ता पाच फुटांपर्यंत खाली खचला. यामुले लाखो लिटर पाणी वाया गेले असून, वाहतूक विस्कळीत झाली.
जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने, याचा परिणाम दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठ्यावर होणार आहे. रस्ता खचल्याने नरीमन पाँईटकडे जाणारी एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. ऐन गर्दीच्यावेळी ही घटना घडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.