ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले

सोन्याचे भाव कमी होत आहेत असा समज असतांना सोन्याचे भाव ऐन लग्नसराईत वधारले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८ हजारांच्या घरात गेला आहे. 

Updated: Jan 20, 2015, 06:30 PM IST
ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले title=

मुंबई : सोन्याचे भाव कमी होत आहेत असा समज असतांना सोन्याचे भाव ऐन लग्नसराईत वधारले आहेत, सोन्याचा दर प्रतितोळा २८ हजारांच्या घरात गेला आहे. 
आठवड्याच्या सुरूवातीलाच सोन्याचा भाव १०० रूपयांनी वाढला आणि सोनं २८ हजार रूपयांवर गेलं आहे. सोने खरेदीचा जोर मागील तीन दिवसांपासून कायम आहे.

भारतात लग्न सराईचा काळ असल्याने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात येतेय. दुसरीकडे जागतिक बाजारपेठेत तेजी असल्याने सोने व्यापाऱ्यांनी मोठी खरेदी केली आहे. सोन्याचा भाव २८ हजार ८० रूपये, तर चांदीचा प्रतिकिलो ३९ हजार १०० रूपये आहे.

सोन्याचे भाव वधारले असतांना सोन्याची खरेदीचा जोरही वाढतांना दिसतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.