खूषखबर : म्हाडाची ४२७५ घरांसाठी लॉटरी

म्हाडा कोकण मंडळ लॉटरी येत्या २४ फेब्रुवारीला निघणार आहे. त्यासाठी उद्या अधिकृत जाहिरात काढण्यात येणार आहे. तब्बल ४२७५ घरासाठी लॉटरी निघणार असून ठाणे, विरार, मीरारोड आणि वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येनं घर उभारण्यात आली आहेत.

Updated: Jan 11, 2016, 02:54 PM IST
खूषखबर : म्हाडाची ४२७५ घरांसाठी लॉटरी title=

मुंबई : म्हाडा कोकण मंडळ लॉटरी येत्या २४ फेब्रुवारीला निघणार आहे. त्यासाठी उद्या अधिकृत जाहिरात काढण्यात येणार आहे. तब्बल ४२७५ घरासाठी लॉटरी निघणार असून ठाणे, विरार, मीरारोड आणि वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येनं घर उभारण्यात आली आहेत.

विरार - ३७५५

बाळकुम ठाणे - १९

मिरा रोड - ३१०

कावसेर ठाणे - १६४

वेंगुर्ला - २७ घरे

१२ जानेवारीला याबाबत जाहिरात प्रसिद्ध होईल. ऑनलाईन नोंदणी १३ जानेवारीला, तर अर्ज भरण्याची सुरुवात १५ जानेवारीला होणार असून

ऑनलाईन नोंदणी अंतिम तारीख ७ फेब्रुवारी तर अर्ज दाखल अंतिम तारीख ९ फेब्रुवारी असणार आहे.

एमआयजी - १५ हजार डिपॉजिट असून ४० लाख ५३ हजार साधारण किंमत आहे. 

एलआयजी - डिपॉजिट ५ हजार तर या घराची साधारण किंमत २२ लाख ६४ हजार असणार आहे.