मराठी-अमराठी वाद; मराठी नाट्यनिर्मात्याला मारहाण

मुंबईतल्या दहिसरमध्ये मराठी-अमराठी वाद निर्माण झालाय. 

Updated: Jul 17, 2015, 09:31 PM IST
मराठी-अमराठी वाद; मराठी नाट्यनिर्मात्याला मारहाण title=

मुंबई : मुंबईतल्या दहिसरमध्ये मराठी-अमराठी वाद निर्माण झालाय. 

बोना व्हेंचर या इमारतीत अमराठी रहिवाशांनी वरून पाणी फेकल्याच्या कारणावरून नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांना मारहाण करत त्यांच्या घरात अंडी आणि चिखल फेकण्याचा संतापजनक प्रकार घडलाय. 

या इमारतीत एकूण १४० घरं असून तब्बल ८० टक्के रहिवाशी अमराठी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी-अमराठी रहिवाशांमध्ये वाद सुरू होता. 

काल रात्री काही अमराठी रहिवासी इमारतीच्या खाली बसलेले होते. त्यांच्या अंगावर वरून कुणीतरी पाणी फेकले. गोविंद चव्हाण यांनीच पाणी फेकल्याचा अमराठी रहिवाशांचा गैरसमज झाला. जवळपास ५० जणांनी चव्हाणांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

या घटनेचं आता राजकारणही सुरू झालंय. ही घटना समजल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत इमारतीच्या आवारात मच्छी फेकली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.