पिवळे-केशरी कार्डधारकांना नऊ सिंलिंडर

पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना सहा ऐवजी नऊ सिलिंडर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील काही जनतेला हा फायदा होणार असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहे.

Updated: Nov 7, 2012, 09:12 PM IST

www.24taas.com, मुंबई
पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना सहा ऐवजी नऊ सिलिंडर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील काही जनतेला हा फायदा होणार असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाने एकूण १६ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
एक लाखावर उत्पन्न असणा-या पांढ-या रेशन कार्डधारकांना हे सवलतीतील सिलिंडर मिळणार नाहीत.
3 गॅस सिलिंडर्सना सबसिडी देण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला खरा, मात्र त्यात मध्यवर्गीयांवर अन्याय करण्यात आलाय. जादा 3 सिलिंडर्सना सरसकट सबसिडी देण्याचा निर्णय घेण्याचं सरकारनं टाळलंय.
केवळ पिवळ्या आणि केशरी कार्डधारकांना जादा गॅस सिलिंडर्स सबसिडीच्या दरात मिळणार आहेत, त्यातही पिवळ्या कार्डधारकांना याचा सरसकट फायदा होणार सला, तरी केशरी कार्डधारकांना मात्र जादा 3 सिलिंडर्सवर केवळ 350 रुपये सबसिडी देण्यात येणार आहे.. तर पांढ-या कार्डधारकांना मात्र या दिलाशातून पूर्णपणे वगळण्यात आलय.