मोदींचं ढोल-ताशांनी स्वागत करणं पडलं महागात!

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, October 1, 2013 - 15:07

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी याचं स्वागत करणं भाजप कार्यकर्त्यांना महागात पडलंय. सायलेन्स झोनमध्ये आवाज केला म्हणून मुंबई भाजपवर कारवाई करत मुंबई पोलिसांनी त्यांना पाच हजार रूपयांचा दंड ठोठावलाय.
एका कार्यक्रमासाठी काल मुंबईत आलेल्या नरेंद्र मोदींच्या स्वागताला मुंबई विमानतळावर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात मोदींचं स्वागत केलं होतं. मुंबई विमानतळ हा परिसर सायलेन्स झोन म्हणून जाहीर करण्यात आलाय. मात्र तरीही तिथं कोळी नृत्य, पंजाबी भांगडा आणि वारकऱ्यांचा गजर करुन भाजप कार्यकर्त्यांनी मोदींचं स्वागत केलं.
शिवाय भाजपनं केलेल्या या स्वागतामुळं परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विमानतळाबाहेर जमलेले हजारो कार्यकर्ते आणि त्यांनी काढलेल्या बाइक रॅलीमुळं या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळी वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरून उपनगराकडे निघालेल्या मुंबईकरांना प्रवास करताना दीड-दोन तास रखडावं लागलं होतं. म्हणूनच महाराष्ट्र पोलीस अॅक्टअंतर्गत मुंबई पोलिसांनी मुंबई भाजपवर ही दंडात्मक कारवाई केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013 - 15:07
comments powered by Disqus