मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानं गुलाम अली दु:खी

शिवसेनेच्या विरोधानंतर मुंबईत पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. याबाबत बोलतांना गुलाम अली यांनी आपली भावना व्यक्त केलीय.  

Updated: Oct 8, 2015, 11:11 AM IST
मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानं गुलाम अली दु:खी title=

मुंबई: शिवसेनेच्या विरोधानंतर मुंबईत पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. याबाबत बोलतांना गुलाम अली यांनी आपली भावना व्यक्त केलीय. जगजित सिंग माझ्यासाठी भावाप्रमाणे होते, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द झाल्यामुळं मला राग आला नसला तरी खूप द:ख झालंय, असं ते म्हणाले.

गुलाम अली हे पाकिस्तानी आहेत म्हणून शिवसेनेनं कार्यक्रमाला विरोध दर्शवला. हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. याविषयी बोलताना गुलाम अली यांनी 'हा सर्व प्रकार दुर्दैवी असल्याचं सांगत दु:ख व्यक्त केलं. गेल्या ४० वर्षांपासून मी संगीत क्षेत्रात आहे, पण याआधी असं कधीच घडलं नव्हतं, भारतात मला प्रत्येक वेळेस प्रेमच मिळालं आहे. संगीत हे असं माध्यम आहे, ज्याद्वारे आपण फक्त प्रेमाच्या गोष्टी करतो, त्यातून सर्वांनाच प्रेम मिळतं. कार्यक्रम रद्द झाल्यानं चाहते निराश झाले आणि त्यामुळं मीही दु:खी झालो' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

आणखी वाचा - शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द

शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी गुलाम अली यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यास शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी विरोध दर्शविला होता. षण्मुखानंद सभागृहाच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. सीमेवर पाकिस्तानकडून हल्ले केले जात असताना गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द केला नाही तर आम्ही आमच्या स्टाईलनं आंदोलन करू अशा इशारा शिवसेनेनं दिला होता. त्यानंतर हा कार्यक्रम आयोजकांनी रद्द केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.