फेरीवाले मुंबईत आंदोलन करणारच...

Last Updated: Tuesday, January 22, 2013 - 09:13

www.24taas.com, मुंबई
पोलिसांच्या कारवाईविरोधात फेरीवाल्यांनी २४ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आझाद हॉकर्स युनियन आणि इतर सात संघटना शांततेच्या मार्गानं आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. मनसेच्या इशाऱ्यांनतही फेरीवाले आंदोलन काढणार आहेत. काहीच दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांना इशारा दिला होता. राज यांच्या इशाऱ्यानंतरही हॉकर्स युनियन आंदोलन करणार आहे.
अधिकृत फेरीवाल्यांवरही पोलीस कारवाई करतात असा आरोप या संघटनांनी केला आहे. तसंच पोलिसांकडून वारंवार त्रास दिला जातो आणि पैशांचीही मागणी केली जात असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
त्यामुळं पोलिसांच्या कारवाईविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहेत. मात्र या आंदोलनाबाबत आता प्रमुख राजकीय पक्ष काय भूमिका घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published: Tuesday, January 22, 2013 - 08:48
comments powered by Disqus