मुंबई-उपनगर, कोकण, खानदेश, मराठवाड्यात धो-धो

कोकणसह मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही पावसाची संततधार सुरू आहे. 

Updated: Sep 1, 2014, 08:46 AM IST
मुंबई-उपनगर, कोकण, खानदेश, मराठवाड्यात धो-धो title=

मुंबई : कोकणसह मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही पावसाची संततधार सुरू आहे. 

खानदेशातील धुळे जळगावातही मुसळधार पाऊस झाला आहे. तर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तीन दिवसापासून संततधार सुरू आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गायब असलेला पाऊस सप्टेंबर महिन्यात धो-धो कोसळून बॅक लॉग भरून काढतोय की काय? असा पाऊस कोसळतोय.

सिंधुदुर्गात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच रायगडातही पाऊस थांबवण्याचं नाव घेत नाहीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.