मुंबई आणि उपनगरांत पावसाची संतत धार

मुंबई शहर आणि उपनगरांत रात्रीपासून पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईत जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस आहे.

Updated: Sep 1, 2014, 10:59 AM IST
मुंबई आणि उपनगरांत पावसाची संतत धार title=

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत रात्रीपासून पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईत जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस आहे.

दादर, परळ भागातही काही ठिकाणी पाणी साचलं आहे. हार्बरची लोकलसेवा 15 ते 20 मिनिटं उशीराने सुरू आहे. सेन्ट्रल रेल्वेची वाहतुकही पाच मिनिटं उशीराने सुरू होती.

पाणी साचल्यामुळे गोरेगाव, अंधेरीतही वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही जोरदार पाऊस होतोय, मात्र अशा पावसातही ऑफिस गाठण्यासाठी चाकरमान्यांची तयारी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.