मनसे मनोमिलन, बिग बीची सुरक्षा वाढवली

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, December 30, 2013 - 18:12

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे नाराज झालेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
दोन्ही पक्षांचे नाराज कार्यकर्ते अमिताभ यांच्या घरांबाहेर विरोध प्रदर्शन करण्याची शक्यता असून त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांच्या घरांभोवती असलेला पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
उत्तर भारतीय नागरिकांवर टीका करणार्यान राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून अमिताभ यांनी उत्तर भारतीय जनतेचा अपमान केला. त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 30, 2013 - 18:12
comments powered by Disqus