बालगोविंदाचा वापर केला, तर पोक्सोंतर्गत कारवाई- हायकोर्ट

हायकोर्टाच्या या निर्णय़ाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं संघर्ष दहीहंडीचे आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय.

Updated: Aug 12, 2014, 02:10 PM IST
बालगोविंदाचा वापर केला, तर पोक्सोंतर्गत कारवाई- हायकोर्ट title=

UPDATE घडामोडी

आव्हाडांचा ‘संघर्ष’ सुरूच : न्यायालयाच्या निर्णयानंतरही, दहिहंडी उत्सव साजरा करण्यावर जितेंद्र आव्हाड अजूनही ठाम आहेत. हायकोर्टाच्या या निर्णय़ाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं संघर्ष दहीहंडीचे आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय.

सरनाईकांचा ‘आदर्श’ : तर, दुसरीकडे हायकोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी कायमची बंद करण्याचा निर्णय आयोजक शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलाय दहिहंडीमध्ये होणाऱ्या गोविंदांचे अपघात रोखण्यासाठी सरनाईक यांनी हा निर्णय घेतलाय. दहीहंडी उत्सवावर होणाऱ्या खर्चातून स्वप्नाली लाड हिला मदत करणार असल्याचंही त्यांनी झी मीडियाशी बोलताना जाहीर केलं.. 

या नेत्यांनी रद्द केल्या दहिहंड्या...

* माजी खासदार आनंद परांजपे यांची ही दहिहंडी रद्द  

* काँग्रेस आमदार कृष्णा हेगडे यांचीही दहिहंडी रद्द

* राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनंत सुतार यांचीही दहिहंडी रद्द

* भाजपा नगरसेवक संजय वाघुले यांचीही दहिहंडी रद्द

* शिवसेनेचे युवा संघटक वैभव नाईक यांनीही दहीहंडी बंद करण्याचा निर्णय  

* जिल्हाध्यक्ष शिवसेना विजय चौगुले यांचीही दहिहंडी रद्द

* काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांचीही दहीहंडी रद्द

 

मुंबई : दहिहंडीच्या मनोऱ्यांची उंची 20 फुटांपेक्षा जास्त नको, तसेच गोविंदांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नको, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

अठरा वर्षाखालील गोविदांना दहीहंडीत भाग घेण्यास मुंबई हायकोर्टानं बंदी घातली आहे. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारनं आपला प्रस्तावही मांडला आहे, तो न्यायालयानं मान्य केलाय. लहान मुलांच्या दहिहंडीत वापर करणाऱ्या मंडळांवर पोक्सोंतर्गत कारवाई करण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. आता २० फुटांपेक्षा जास्त उंचीची दहीहंडी असणार नाही. त्यामुळं चार ते पाच थर लागतील.

दहिहंडीचं आयोजन हे खुल्या मैदानात करावं, असंही कोर्टानं बजावलं आहे. गोविंदांसाठी कुशन वापरावेत ज्याने दुखापत होणार नाही.

राज्य सरकारने हे प्रस्ताव हायकोर्टासमोर ठेवले होते, हे सर्व प्रस्ताव हायकोर्टाने लागू केले आहेत. तसेच दहिहंडी मंडळाची नोंदणी आवश्यक असल्याचंही कोर्टाने म्हटलंय.

लहान मुलांचा वापरकेल्यास पोक्सोंतर्गत कारवाई करण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत. तसेच दहिहंडी आयोजकांवर लक्ष द्यावे, गोविंदांच्या वयाचा पुरावाही देण्यात यावा, असंही हायकोर्टानं म्हटलंय.

 

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.