मुंबईकरांना खुशखबर, लोकलमध्ये बॅग लटकविण्यासाठी हूक

लोकलच्या तूफान गर्दीत ऑफिसला जाताना खांद्यावरची बॅग सांभाळताना अक्षरशः त्रेधातिरीपट उडते. रेल्वेप्रशासनानं नेमकी हीच कोंडी फोडण्यासाठी आता लोकलमध्ये हूक लावण्याचे आदेश दिले आहेत.

Updated: Oct 26, 2015, 06:41 PM IST

 

मुंबई : लोकलच्या तूफान गर्दीत ऑफिसला जाताना खांद्यावरची बॅग सांभाळताना अक्षरशः त्रेधातिरीपट उडते. रेल्वेप्रशासनानं नेमकी हीच कोंडी फोडण्यासाठी आता लोकलमध्ये हूक लावण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या लोकलमध्ये सामान ठेवण्यासाठी एक लॉफ्ट उपलब्ध असतो. पण वारेमाप गर्दीमुळे प्रत्येकालाच या लॉफ्टवर बॅग ठेवण्याची जागा मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी स्वतःच आपलं हूक घेऊन लोलकमधून प्रवास करतात. रेल्वे प्रशासनानं ही अडचण लक्षात घेऊन प्रवास सुखकर करण्यासाठी चेन्नईच्या लोकल बनवणाऱ्या कारखान्याला लोलकमध्ये हूकची सोय करण्याचे निर्देश दिले आहेत. 

नव्यानं येणाऱ्या लोकलच्या डब्यांमध्ये बॅगा लटकवण्यासाठी ही सोय असेल. लगेज लॉफ्ट व्यतिरिक्त कुठे कुठे हे हूक लावता येतील? त्यासाठी लोकलच्या डिझाईनमध्ये बदल करावे लागतील का? याचीही चाचपणी सध्या करण्यात येत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.