जुनी 500ची नोट दिली म्हणून बेदम मारहाण, हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक

 जेवणाचे बिल देण्यासाठी जुनी ५०० रुपयांची नोट दिल्याने हॉलचे मॅनेजर आणि वेटरने मिळून एका जोडप्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

Updated: Nov 11, 2016, 05:56 PM IST
जुनी 500ची नोट दिली म्हणून बेदम मारहाण, हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक title=

मुंबई : माहीम पश्चिम येथे गंगा विहार हॉटेलमध्ये काल जेवणाचे बिल देण्यासाठी जुनी ५०० रुपयांची नोट दिल्याने हॉलचे मॅनेजर आणि वेटरने मिळून एका जोडप्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

काल रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास माहीम येथील गंगा विहार हॉटेलमध्ये एक दाम्पत्य जेवले आणि त्या जेवणाचे बिल ५८० रुपये देण्यासाठी म्हणून त्यांनी पहिले कार्ड स्वॅप केले. पण कार्ड चालत नसल्याने जोडप्याने १ हजार आणि ५०० रुपयांची नोट देवू केली. मात्र, हॉटेलने या नोटा स्विकारणार नाही, असे सांगितले. त्यावेळी दोघांच्यात बाचाबाची झाली.

दाम्पत्याकडे सुट्टे पैसे नसल्याने वेटरने मारहाण केली. यावेळी महिलेला देखील वेटर आणि हॉटेल मॅनेजरने मारहाण केली. या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाण प्रकरणी हॉटेल मॅनेजर आणि वेटरसह एकूण सहा लोकांना माहीम पोलिसांनी अटक केली.