मुंबईतील फुटपाथवरील हॉटेलवर कारवाई

थेट फूटपाथवर अतिक्रमण करून बिनधास्त हॉटेल थाटलेल्या वोक हाई या लोअर परेल परिसरातील हॉटेलवर मुंबई महापालिकानं आज कारवाई केली. 

Updated: Feb 20, 2016, 04:50 PM IST
मुंबईतील फुटपाथवरील हॉटेलवर कारवाई title=

मुंबई : थेट फूटपाथवर अतिक्रमण करून बिनधास्त हॉटेल थाटलेल्या वोक हाई या लोअर परेल परिसरातील हॉटेलवर मुंबई महापालिकानं आज कारवाई केली. 

लोअर परेलमधील फिनिक्स मॉलसमोर फूट पाथवरच गेली अनेक महिने वातानुकूलित हॉटेल बांधलं होतं. महापालिकेनं संबंधित हॉटेल मालकालानोटीस दिली. 

मात्र, हॉटेल काढलं गेलं नाही. अखेर यासंबंधी न्यायालयात लढा सुरू झाला. आणि न्यायालयानं संबंधित हॉटेल अतिक्रमण करून बांधल्याचं सांगत त्यानुसार कारवाई केली.