सांगा कसं होणार सामांन्यांचं काम?.. राज्यात लेट लतिफगिरी

सरकारी अधिका-यांची लेट लतिफगिरी कमी करण्यासाठी मंत्र्यांचा व्हॉट्स अॅपवर ग्रुप बनवण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यंकय्या नायडूंना नुकताच दिला. त्याअगोदर दोन केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये अचानक धडक देऊन तिथली अनास्था अधिका-यांच्या लक्षात आणून दिली होती. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कार्यालयांत काय परिस्थिती आहे, याचा वेध घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला. 

Updated: Aug 2, 2014, 10:59 AM IST
सांगा कसं होणार सामांन्यांचं काम?.. राज्यात लेट लतिफगिरी

मुंबई : सरकारी अधिका-यांची लेट लतिफगिरी कमी करण्यासाठी मंत्र्यांचा व्हॉट्स अॅपवर ग्रुप बनवण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यंकय्या नायडूंना नुकताच दिला. त्याअगोदर दोन केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये अचानक धडक देऊन तिथली अनास्था अधिका-यांच्या लक्षात आणून दिली होती. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कार्यालयांत काय परिस्थिती आहे, याचा वेध घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला. 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, दाम करी काम, कामापुरता मामा - ताकापुरती आजीबाई. क्रीया, काम किंवा कर्म या विषयी पुराणकाळापासून आधुनिक काळापर्यंत बरंच लिहिलं आणि बोललं गेलंय.  तशीचचर्चा सरकारी कार्यालयांत दिसत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि व्यंकय्या नायडू यांनी नुकतीच सरकारी कार्यालयांना दिलेली सरप्राईज व्हिजीट हे चर्चेचं निमित्त ठरलं. त्यानंतर आम्हीदेखील महाराष्ट्रातल्या काही सरकारी कार्यालयांतली परिस्थिती पाहिली. तिथे तरभलतच वेगळ दिसलं.

सरकारी कार्यालयं आणि तिथली कार्यतत्परता या परस्पर विरोधी संकल्पना झाल्याचं वास्तव सध्या समोर येतंय. कार्यालयात वेळेवर हजर न राहणं, कार्यालयात आल्यावरदेखील जागेवर न सापडणं, काम करण्याची इच्छाच नसणं आणि कामाबाबत उदासिन राहणं अशा अनेक कार्यालयीन आजारांची लक्षणं आपल्याला वारंवार बहुतांशी सरकारी कार्यालयांमध्ये आढळतात.

हे असं का होतं? काम करण्याची प्रेरणा अधिकारी आणि कर्मचारी हरवून का बसतात? कर्मचाऱ्यांना येणारी उदासिनता हा एकप्रकारे साथीचा आजार समजायचा का? या अनास्थेचा सामान्यांना नेमका काय फटका बसतो? त्या तालुक्याची, जिल्ह्याची किंवा राज्याची प्रगती अशा अनास्थेमुळं मंदावते का? आणि या अनास्थेवर उपाय काय? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.

'लेट लतीफ कारभार'  आज सर्वत्र दिसून येत आहे. गावापासून ते दिल्लीपर्यंत त्याची प्रचिती येत आहे. रत्नागिरी जिल्हयात अनेक सरकारी कार्यालयांत अनेकवेळा अधिकारी, कर्मचारी दिसून येत नाही. परिणामी सामान्यांना साध्या कामासाठी वेळ, पैसा आणि दिवस वाया घालवावा लागत आहे. तर नाशिकमध्ये आपत्ती कक्षात अशीच परिस्थिती दिसून आली. त्याठिणी कोणीही नाही. सर्व यंत्रणा संभाळण्यासाठी एकही अधिकारी, कर्मचारी नसल्याचे कॅमेऱ्यात कैद आलं आहे. माळीणमधील दुर्घटना अनेकांच्या जीवावर उठली. याला सरकारी अधिकारीच जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. 

माळीण गावात आणि सभोवताली झालेल्या वृक्षतोडीमुळे आणि शेती करता जमीन सपाट केल्याने भूस्खलनाची ही दुर्घटना घडली असल्याची शक्यता जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने व्यक्त केली आहे. यासाठी तालुका अधिकाऱ्याला जबाबदार धऱण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.