आता होणार शिकाऱ्यांचीच शिकार!

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, July 30, 2013 - 22:52

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता जो वाघाची शिकार करेल, त्याची खैर नाही. कारण वाघाची शिकार करणा-याला ताबडतोब गोळ्या घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. व्याघ्रदिनानिमित्त सरकारनं नवी मोहीम सुरू केलीय. त्याअंतर्गत वाघाला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
दमदार चाल.... सोनसळी त्वचा..... करारी बाणा..... जरब बसवणारी नजर...... या दिमाखात वावरणारं हे उमदं जनावर.... जंगलात दरारा असणारा आणि वन्यजगताचं वैभव असणा-या या वाघांची संख्या घटत चाललीय..... जगभरात हा चिंतेचा विषय ठरलाय.....वाघाच्या संरक्षणाचे आणि याविषयी जनजागृतीचे कितीही प्रयत्न झाले तरी वाघाची शिकार थांबत नाहीय..... म्हणूनच राज्य सरकारनं वाघाच्या संरक्षणासाठी नवं पाऊल उचललंय. लिव्ह मी अलोन... सेव्ह द टायगर.... ही मोहीम सुरू करण्यात आलीय. वाघाची शिकार करणा-या शिका-याला दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेत.
वाघाची कातडी आणि नखांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे वाघांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय टोळीचा समावेश असल्याचा संशय आहे. सेव्ह द टायगर ही मोहीम आणखी सक्षम करण्यासाठी सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतलाय.
वाघाला जगवणं अत्यंत गरजेचं आहे..... आता शूट ऍट साईटचे आदेश दिल्यावर तरी वाघांची शिकार थांबेल, अशी अपेक्षा आहे.... पण या आदेशाची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं झाली तरच वाघ प्राणी वाचू शकतील...... नाही तर तो जंगल बुकमधल्या फक्त गोष्टींपुरताच उरेल.....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.



First Published: Tuesday, July 30, 2013 - 22:52


comments powered by Disqus