संधी मिळाल्यास राज-उद्धव यांना एकत्र घेऊन बसेन- राऊत

`मला संधी मिळाल्यास या दोघांनाही एकत्र घेऊन बसेन,``शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला तशी संमती दिल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी नक्की चर्चा करीन

Updated: Jan 30, 2013, 02:45 PM IST

www.24taas.com, मुंबई
`मला संधी मिळाल्यास या दोघांनाही एकत्र घेऊन बसेन,``शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला तशी संमती दिल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी नक्की चर्चा करीन, असे वक्तव्य शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
`राज आणि उद्धव यांच्यात चर्चा घडवून आणेन.`त्यांना एकत्र येण्याचा प्रश्न दोघांना विचारीन.` असं म्हणत संजय राऊत आता स्वत: पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र आणण्याविषयी संजय राऊत प्रयत्नशील असल्याचे दिसते. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत सेना-मनसे एकत्र येणार का? या प्रश्नावर अनेक चर्चा सुरू असताना सामनाचे संपादक संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी स्पष्ट केल्या.
आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत, त्यामुळे राज ठाकरे आता काय भुमिका घेणार हे देखील महत्त्वाचं असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.`राज्यात सत्तांतर होण गरजेच आहे.आणि त्यासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरजेचे आहे. मात्र कुणीही शिवसेनेची काळजी करू नये, आम्ही बाळासाहेबांची भूमिका पुढे नेणार.` असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मात्र संजय राऊत यांनी बाकी काहीही प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळले, `बाकीच्या प्रश्नांची उत्तरे ही, उद्याच्या मुलाखतीत मिळतील, पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तेर मी आज देणार नाही, त्यासाठी काही काळ थांबावं लागणार आहे.` असं सांगून संजय राऊत यांनी सेनेचे भुमिका स्पष्ट केली आहे.