राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कृत्रिम पावसाची तयारी

पाऊस लांबल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दुष्काळात वाढ होत असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे. दरम्यान, सरसरी पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामाना खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ३० कोटी रुपये खर्च करुन कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Updated: Jun 3, 2015, 03:40 PM IST
राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कृत्रिम पावसाची तयारी title=
संग्रहीत

मुंबई : पाऊस लांबल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दुष्काळात वाढ होत असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे. दरम्यान, सरसरी पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामाना खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ३० कोटी रुपये खर्च करुन कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

मान्सून अंदमानच्या पुढे सरकतच नसल्याने केरळातील त्याचे आगमन लांबले आहे. परंतु मान्सूनची उशिराने होत असलेली वाटचाल पाहता यंदा सरासरी ८८ टक्केच पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याचे दु:खद अंत:करणाने आपल्याला सांगावे लागत आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
हवामान खात्याने नव्याने वर्तविलेला अंदाज खरा आहे की नाही याची खातरजमा करण्याचे काम सुरु आहेच.

राज्यातील पावसाचे आगमन लांबत चालल्यामुळे मराठवाडा, खान्देश तसेच विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात या महिनाअखेरपर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी साधारणपणे ३० कोटींचा खर्च येणार असून त्याला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, कोरडे हवामान असलेल्या भागात हा प्रयोग करण्यात येणार असून यावर प्रारंभी दहा कोटी खर्च करण्यात येणार आहेत. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर दुष्काळग्रस्त भागातही हा प्रयोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने त्यासाठी निविदाही काढल्या आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर ही यंत्रणा कायम राखण्यात येईल. ३० कोटी खर्च करून जर शेतकर्‍यांचे ३०० कोटींचे नुकसान टळणार असेल तर असे प्रयोग पुढे चालू ठेवू, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान,हवामान खात्याने मान्सून केरळ किनारपट्टीवर ५ जून रोजी पडले, असा नवा अंदाज व्यक्त केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.