मुंबईतील या कुटुंबाने जाहीर केली 2 लाख कोटींची संपत्ती, आयटीने दिले चौकशीचे आदेश

मुंबईली एका कुटुंबाने तब्बल २ लाख कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या वांद्रेस्थित सय्यद कुटुंबाने सरकारच्या उत्पन्न प्रकटन योजना 2016 (आयडीएस) अंतर्गत ही घोषणा केलीये.

Updated: Dec 4, 2016, 08:30 PM IST
मुंबईतील या कुटुंबाने जाहीर केली 2 लाख कोटींची संपत्ती, आयटीने दिले चौकशीचे आदेश title=

मुंबई : मुंबईली एका कुटुंबाने तब्बल २ लाख कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या वांद्रेस्थित सय्यद कुटुंबाने सरकारच्या उत्पन्न प्रकटन योजना 2016 (आयडीएस) अंतर्गत ही घोषणा केलीये.

सय्यद यांच्या कुटुंबात चार जण आहेत. अब्दुल रझाक मोहम्मद सय्यद, त्यांचा मुलगा मोहम्मद आरिफ, त्यांची पत्नी रुक्साना आणि बहीण नूरजहाँ अशी यांची नावे आहेत.

या कुटुंबाने जाहीर केलेल्या अघोषित संपत्तीच्या दाव्यावर आयकर विभागाने संशय व्यक्त केला असून याप्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. या कुटुबांने केलेला दावा खोटा असल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केलाय.