भारत बंद: बँका बंद, आता ATMवरच भिस्त

Last Updated: Wednesday, February 20, 2013 - 11:04

www.24taas.com, मुंबई
कामगारांच्या देशव्यापी संपाचा परिणाम बँकिंग व्यवहारांवर दिसून येत आहे. कालची शिवजयंतीची सार्वजनिक सुट्टी आणि कामगारांच्य देशव्यापी संपामुळं बँकांचे व्यवहार ठप्प आहेत.
केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राष्ट्रीय बँकांच्या कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांची भिस्त आता एटीएमवर राहणार आहे. ग्राहकांसाठी पैसै काढण्याचा एकमेव मार्ग एटीएम असणार आहे. त्यामुळं आजपासून एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा दिसणार आहेत.
मुंबईत बंदचा परिणाम झालेला दिसून येत नाहीये.. जनजीवन सुरळीतपणे चाललं आहे. कामगार नेते शरद राव यांनी या संपातून माघार घेतल्याने बंद म्हणावा तसा मुंबईत दिसत नाहीये.



First Published: Wednesday, February 20, 2013 - 10:43


comments powered by Disqus