कोलकत्याला १०७मध्ये गुंडाळले....

 आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला १०७ धावांमध्ये गुंडाळले. 

Updated: May 19, 2017, 10:08 PM IST
 कोलकत्याला १०७मध्ये गुंडाळले....
सौजन्य बीसीसीआय

मुंबई :  आयपीएल १०च्या दुसऱ्या क्वॉलीफायरमध्ये मुंबई इंडियन्सने कोलकता नाईट रायडर्सला १०७ धावांमध्ये गुंडाळले. 

मुंबईकडून शानदार गोलंदाजी करताना कर्ण शर्मा याने चार विकेट पटकावल्या. तर जसप्रीत बुमरा याने तीन आणि मिचल जॉन्सन याने दोन विकेट घेतल्या. 

कोलकताकडून इशांत जग्गी याने २८ आणि सुर्यकांत यादव याने सर्वाधिक ३१ धावा केल्या. 

मागील सामन्यात पुण्याकडून पराभूत झाल्यावर मुंबईने चांगली कामगिरी करत कोलकत्याला १०७ धावांत रोखले आहे. या सामन्यातील विजयी संघ २१ तारखेला पुण्याविरूद्ध हैदराबादमध्ये फायनल खेळणार आहे.