मृतदेह लोकलनं फरपटत गेला, पण मुंबईकर गप्प!

Last Updated: Wednesday, September 3, 2014 - 21:48
मृतदेह लोकलनं फरपटत गेला, पण मुंबईकर गप्प!

मुंबई: मुंबई आणि मुंबईकरांच्या संवेदना हरवल्या आहेत की काय? अशी घटना समोर आलीय.. ही घटना सोमवार संध्याकाळची आहे.

चेंबूरजवळ लोकल ट्रेन अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. रेल्वेत अडकल्यामुळं हा मृतदेह टिळकनगर स्टेशनपर्यंत फरपटत आला.. मात्र त्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह उचलण्यासाठी कुणीही पुढं आलं नाही. जवळपास वीस मिनिटं हा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडून होता. कुणीही या मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली नाही. 

अखेर एका बूटपॉलिश करणाऱ्या व्यक्तीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि अॅम्ब्युलन्स बोलावून मृतदेह हटवण्यात आला. मात्र या घटनेमुळं मुंबईकरांना झालंय काय? त्यांची संवेदना खरंच हरपलीय का? असा सवाल उपस्थित होतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Wednesday, September 3, 2014 - 21:48
comments powered by Disqus