बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद आता उद्धवच्या कोर्टात

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सुरू असलेला वाद आता कोर्टाबाहेर सेटल होण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 17, 2014, 11:11 PM IST
बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद आता उद्धवच्या कोर्टात title=

मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सुरू असलेला वाद आता कोर्टाबाहेर सेटल होण्याची शक्यता आहे.  

कारण न्यायालयाच्या बाहेर हे प्रकरण सोडवावं, ही मुंबई उच्च न्यायालयाची विनंती जयदेव ठाकरे यांनी मान्य केली होती. तर उद्धव ठाकरे यांनी आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंटला आधी विरोध दर्शवला होता. मात्र या वादामुळं ठाकरे परिवारातले अंतर्गत विषय चव्हाट्यावर येतील आणि उगाच चर्चेचा विषय होईल. त्यामुळं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी विचार करावा असं न्यायालयानं सांगितलं. 

न्यायालयाच्या या विनंतीला मान देऊन, बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा वाद न्यायलयाबाहेर सोडवता येईल का? यावर विचार करु, असं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात सांगितलं. त्यामुळं लवकरच या वादावर पडदा पडेल, अशी शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.