नोकरीची संधी : महापालिकेत ९४२ पदांसाठी भरती

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, March 3, 2014 - 10:10

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध विभागांमध्ये तब्बल ९४२ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. सामान्य प्रशासन विभागातील विविध विभागांमध्ये लिपिक पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.
यासाठी अर्जदारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनं केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं भरायचे अर्ज http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इथे, ‘Clerk Recruitment 2014’ या लिंकवर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल.
इच्छुका १४ मार्च २०१४ ते ०३ एप्रिल २०१४ पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014 - 10:05
comments powered by Disqus