मॉडेल अंजुमला २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी

मुंबईतली मॉडेल आणि फुटकळ भूमिका करणारी अभिनेत्री अंजुम नायरला पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी देण्यात आलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 9, 2013, 09:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतली मॉडेल आणि फुटकळ भूमिका करणारी अभिनेत्री अंजुम नायरला पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी देण्यात आलीय.

ओशिवरातल्या समर्थ आंगन सोसायटीत राहणाऱ्या अंजुम नायरनं आपल्या मित्र-मैत्रिणींसह मोठ्यानं म्युझिक लावून रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घातला होता. त्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अंजुमनं अश्लिल शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन समज दिल्यानंतर सोडून देण्यात आलं होतं.
मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तिची व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्याचे आदेश दिले होते. नेमका अंजुमनं कसा धिंगाणा घातला त्याचा झी मीडियानं मिळवलेला व्हिडिओ पाहूयात...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

कोणता तमाशा केला होता अंजुमनं पाहा व्हिडिओ