हमारी भूल 'कमल' का फूल - सराफा व्यापारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आता सराफांच्या आंदोलनात उडी घेतलीय. सणासुदीच्या काळातही दुकानं बंद ठेवा, जनतेला त्रास झाल्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही असा सल्ला राज ठाकरेंनी सराफा संघटनांना दिलाय. 

Updated: Mar 25, 2016, 05:16 PM IST
हमारी भूल 'कमल' का फूल - सराफा व्यापारी title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आता सराफांच्या आंदोलनात उडी घेतलीय. सणासुदीच्या काळातही दुकानं बंद ठेवा, जनतेला त्रास झाल्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही असा सल्ला राज ठाकरेंनी सराफा संघटनांना दिलाय. 

जगभरातल्या मोठ्या व्यापा-यांना पुढं आणण्याचं सरकारचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. सराफा संघटनांनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. यावेळी संघटनांच्या आंदोलकांनी हमीरी भूल कमल का फूलच्या जोरदार घोषणा दिल्या.