केबीसी घोटाळा: सूत्रधार चव्हाणाला भारतात आणणार

सिंगापूरला फरार झालेल्या राज्यातील केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण पुन्हा भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. 

Updated: Apr 7, 2015, 05:59 PM IST
केबीसी घोटाळा: सूत्रधार चव्हाणाला भारतात आणणार title=

मुंबई : सिंगापूरला फरार झालेल्या राज्यातील केबीसी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण पुन्हा भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. 

या प्रकरणी राज्य सरकारकडून केंद्र सरकार आणि इंटरपोलची मदत घेत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

राज्यातील नाशिक, हिंगोली, परभणी, नांदेड, औरंगाबाद, बीड आणि इतर काही जिल्ह्यातील गुंतवणुकदारांना केबीसीने तब्बल 220 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. 

गुंतवणुकदारांची ही रक्कम परत करण्यासाठी सरकारने केबीसीचा सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण याची मालमत्ता जप्त केली असून आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत 80 कोटी रुपये इतकी आहे. 

चव्हाण याची सिंगापूर इथेही मालमत्ता आहे, ती मालमत्ताही जप्त करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.