विधान परिषदेच्या राजकारणावर खडसेंचं वर्चस्व

सरळ सोप्या वाटणाऱ्या विधानपरिषदमध्ये जोरदार राजकारणाचे रंग दिसून आले. भाजपाने एकीकडे घटक पक्षांना नमतं घ्यायला भाग पाडले. तर मुख्यमंत्रीपदाच्या दर्जाचे स्वत:ला समजणाऱ्या खडसे यांनी आपली ताकद दाखवून दिली.

Updated: Jan 20, 2015, 09:59 PM IST
विधान परिषदेच्या राजकारणावर खडसेंचं वर्चस्व title=

मुंबई : सरळ सोप्या वाटणाऱ्या विधानपरिषदमध्ये जोरदार राजकारणाचे रंग दिसून आले. भाजपाने एकीकडे घटक पक्षांना नमतं घ्यायला भाग पाडले. तर मुख्यमंत्रीपदाच्या दर्जाचे स्वत:ला समजणाऱ्या खडसे यांनी आपली ताकद दाखवून दिली.

विधानपरीषदच्या 4 जागांसाठी होणा-या निवडणुकीमध्ये संख्याबलामुळे शिवसेना- भाजपचे उमेदवार सहज विजयी होणार हे केव्हाच् स्पष्ट झालं होतं.  एक जागा सुभाष देसाई यांच्यासाठी नक्की झाली होती. तेव्हा उरलेल्या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. 

धनगर समाजाचा राग शांत करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना परिषदचे तिकिट देण्याचे नक्की केले होते. मात्र तिकिट मिळेल ते भाजपाच्या फोर्मवर असा दबाव भाजपाने जानकर यांच्यावर शेवटपर्यन्त ठेवला आणि अखेर जानकर नमले.

भाजपाच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणा-या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना पुन्हा एकदा भाजपाने नमते घ्यावे लावले आणि भाजपाच्या चिन्हावर, 10 महिन्याच्या कालावधी बाकी असलेल्या त्यांच्याच जागेवर उमेदवारी दिली.

राज्य सरकारविरोधात आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भाजपाने महत्व दिले नाही. तसंच सरकारमध्ये येत आंदोलन करणे स्वाभिमानीलाही अवघड जाणार असल्याने संघटनेने टीका करत दूर रहाणे पसंत केले.

मुख्यमंत्रीपद न मिलान्याने नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी मात्र या निवडणुकीत आपले नाणे खणखणित वाजवले. भाजपाचे मुख्य परवक्ते माधव भंडारी यांचे नाव  काल रात्रिपर्यन्त नक्की होते. मात्र शेवटच्या क्षणी खडसे यांनी सूत्रे हलवत जळगावच्या त्यांच्या विश्वासु स्मिता वाघ यांचे नाव पुढे सरकवले आणि भंडारींचा पत्ता कट झाला.

सरकार स्थापन झाल्यावर सूत्रे ही आपल्याच हातात असल्याचं या विधानपरीषद निवडणुकीने भाजपाने पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र दुखावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आरपीआयसारखे पक्ष यांना भाजप किती दिवस सांभाळतो यावर भाजपची विश्वासहर्ता टिकून रहाणार हे निश्चित.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.